Homeताज्या बातम्या

स्मार्ट मीटर बसविताना अनियमितता झाल्याचा ‘वंचित’चा आरोप 

राहाता : पिंपळस, साकुरी व परिसरात संमतीशिवाय वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसविणे, अवाजवी वीजबिले आकारणे तसेच नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हा संघटक दीपक कसबे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहाता तालुक्यातील पिंपळस गावात १६ मार्च २०२६ पासून महावितरणच्या राहाता कार्यालयातील सहाय्यक अभियंत्यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या घरांतील कार्यरत वीज मीटर कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी संमती न घेता काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसविले. मीटर बसविताना कोणताही पंचनामा करण्यात आला नाही किंवा ग्राहकांना माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिले तीन ते चारपट वाढल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. पूर्वी सुमारे ५०० रुपये येणारे वीजबिल आता सुमारे दोन हजार रुपये येत असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडल्याचेही नमूद करण्यात आले आहे.या संदर्भात नागरिक व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही न होता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जुने मीटर आणि नव्याने बसविलेल्या स्मार्ट मीटरचा क्रमांक एकच असल्याचा दावाही करण्यात आला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अन्यथा महावितरणच्या पिंपळस व राहाता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.निवेदन देताना दीपक कसबे, किशोर पठारे, रावसाहेब बनसोडे, भरत निकाळे, जय भोसले, अनुराग निकम, शंकर गायकवाड, अनिल आवारे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत उघडी विहीरअपघाताचा धोका;  प्रशासनाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
एकच कत्तलखाना दोनदा कसा हटविला? : हाडा  

COMMENTS