Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार दळवी यांच्या गाडीचा अपघात

रायगड ः अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
नवले पुलावरील अपघातात एकाचा मृत्यू
ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.

रायगड ः अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. रायगडमधील मुरुड तालुक्यातील उसडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात आमदार दळवी सुखरुप आहेत. पण या अपघातात एका मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झाला त्यावेळेला आमदार महेंद्र दळवी हे कारमध्ये होते. आमदार महिंद्र दळवी यांच्या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रात्री उशिरा रायगड जिल्हा पोलिसप्रशासनातील उच्चपदस्थ अधिकार्‍याकडून देण्यात आली.

COMMENTS