Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमानिमित्त नांदेड शहरातील आठवडी बाजार 25 जानेवारी रोजी बंद

नांदेड । प्रतिनिधी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंद-दी-चादर हा भव्य राज्यस्तरीय कार्यक्रम नांदेड येथे आयोज

ई-गव्हर्नन्समध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्राचा डंका; महाराष्ट्र राज्यात पटकावला प्रथम क्रमांक
अपक्ष-एमआयएम-वंचितांचा फॅक्टर, क्रॉस वोटिंगचा धोका आणि पक्ष्यांच पॅनलमधून ‘एक मत’ स्वतःला मागण्याचा खेळ
मराठवाड्यातील रेल्वे विकासाला गती मिळणार : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

नांदेड । प्रतिनिधी

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंद-दी-चादर हा भव्य राज्यस्तरीय कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व हिंद-दी-चादर राज्यस्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली शीख, सिखलकरी, बंजारा-लमान, मोहियाल, सिंधी तसेच इतर समाजांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दि. 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान येथे होणार आहे.

या कार्यक्रमासाठी पंजाबसह देशातील विविध राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक व मान्यवर उपस्थित राहणार असून, मोदी मैदान, सचखंड गुरुद्वारा, रेस्ट हाऊस परिसर, बसस्थानक, जुना मोंढा तसेच गुरु गोविंदसिंगजी विमानतळ परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर अ‍ॅक्ट, 1862 मधील कलम 5 अन्वये रविवार, दि. 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर आठवडी बाजार सोमवार, दि. 26 जानेवारी 2026 रोजी भरविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश दि. 22 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आला आहे.

COMMENTS