Homeताज्या बातम्याअहमदनगर

चर्च कारवाईविरोधात ख्रिस्ती समाज आक्रमकप्रशासनाच्या भूमिकेवर सवाल ; मंत्री आठवलेंकडे मांडली व्यथा

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथिल चर्च बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात समस्त ख्रिस्ती समाज व धर्मगुरूंनी आक्रमक भूमिका घेत पालकम

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले
शिर्डीत प्रतिवर्षी पाच लाख तोफगोळे तयार होणारपालकमंत्री विखे ; तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे २३ मे रोजी उद्घाटन

देवळाली प्रवरा : राहुरी फॅक्टरी येथिल चर्च बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात समस्त ख्रिस्ती समाज व धर्मगुरूंनी आक्रमक भूमिका घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे धाव घेतली. धर्मांतराच्या खोट्या तक्रारींच्या आडून ख्रिस्ती समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या चर्च बांधकामांवर अचानक देवळाली प्रवरा गरपालिकेकडून नोटिसा बजावून बांधकाम पाडण्याची कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.काही संघटनांकडून आमिष दाखवून जबरदस्ती धर्मांतर केल्याचे आरोप केले जात असून, त्याआधारे गुन्हे दाखल करून समाजाला बदनाम केले जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला. तसेच धार्मिक स्थळांमध्ये घुसून प्रार्थना व धार्मिक विधींमध्ये अडथळे निर्माण होत असल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.चर्च बांधकामांवरील कारवाई तात्काळ स्थगित करून सर्व संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अन्यथा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी आयोजक पास्टर अविनाश सरोदे, इंडिया बायबल चर्च फेलोशिप प्रसाद नगरचे सभासद, रोहिणी सॅकमन, राहुरी तालुका पास्टर फेलोशिप, श्रीरामपूर पास्टर फेलोशिप, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, भाऊसाहेब पगारे, स्नेहलता दिवे, बोरुडे तसेच सकल ख्रिस्ती समाजाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS