Homeताज्या बातम्याराजकारण

अमेरिका-इराण चर्चा ठरली निष्फळहोर्मुझ, अण्वस्त्र आणि सार्वभौमत्वावरून तणाव शिगेला

तेहरान : पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे पार पडलेली अमेरिरका-इराण यांच्यातील बहुप्रतिक्षित शांतता चर्चा अखेर कोणताही ठोस तोडगा न निघता निष्फळ ठरली.

थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येवर हल्ल्याचा प्लॅन
इराणने अणुकार्यक्रम थांबवावा अन्यथा करार अशक्य; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ठाम भूमिका
होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धाचा वणवा; भारतीय जहाजावर भीषण हल्ला, एक खलाशी शहीद तर १८ जण मृत्यूच्या दाढेत!
Iran-Israel war: Trump threatens China with 50% tariffs if it sends arms to  Iran - The Tribune

तेहरान : पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे पार पडलेली अमेरिरका-इराण यांच्यातील बहुप्रतिक्षित शांतता चर्चा अखेर कोणताही ठोस तोडगा न निघता निष्फळ ठरली. जवळपास 21 तास चाललेल्या या चर्चेनंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर अटी कठोर ठेवल्याचा ठपका ठेवत आपापली भूमिका अधिक ठाम केली आहे. परिणामी, मध्य-पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, आम्ही इराणसमोर व्यवहार्य आणि संतुलित प्रस्ताव ठेवला होता; मात्र त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे कोणताही करार न करता आम्हाला परतावे लागत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अण्वस्त्रविकास थांबवणे आणि प्रादेशिक स्थैर्य राखणे हे अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट होते, परंतु त्या संदर्भात अपेक्षित सहमती मिळू शकली नाही. चर्चेच्या पहिल्या टप्प्यात वातावरण तुलनेने सकारात्मक असल्याचे सांगितले जाते. दोन्ही बाजूंनी संवादाची तयारी दर्शवली होती. मात्र, जसजसे चर्चेचे मुद्दे गंभीर होत गेले, तसतसे मतभेद तीव्र होत गेले. विशेषतः अण्वस्त्र कार्यक्रम, आर्थिक निर्बंध आणि सामुद्रिक नियंत्रण या मुद्द्यांवरून दोन्ही देश एकमेकांच्या भूमिकांपासून दूर गेले. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर टीका करताना म्हटले की, अमेरिकेच्या अटी अवास्तव आणि आमच्या सार्वभौमत्वावर गदा आणणार्‍या होत्या. अशा अटी आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नाही. त्यांच्यासह इराणचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनीही कठोर भूमिका घेतली. अमेरिकेने स्पष्ट केले की, या मार्गावर कोणत्याही देशाचे एकाधिकार मान्य होणार नाहीत आणि जागतिक व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी हा मार्ग खुला राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ती लष्करी आणि धोरणात्मक पावले उचलण्यास अमेरिका तयार असल्याचेही व्हान्स यांनी नमूद केले. चर्चेदरम्यान अमेरिकेच्या युद्धनौकांची हालचाल वाढल्याचे वृत्त समोर आले. यामुळे इराणने तीव्र नाराजी व्यक्त केली. इराणने या हालचालींना आपल्या सुरक्षेसाठी धोका मानत कठोर शब्दांत निषेध नोंदवला. काही अहवालांनुसार, इराणने अमेरिकन जहाजांना संभाव्य लक्ष्य म्हणूनही उल्लेख केला, ज्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. इराणने आपल्या गोठवलेल्या परकीय मालमत्तेच्या मुक्ततेचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आणला. अंदाजे सहा अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेबाबत इराणने सवलत मागितली. मात्र, अमेरिकेने या मागणीवर ठोस सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे हा मुद्दा देखील तणाव वाढवणारा ठरला.

अण्वस्त्र, होर्मुझ प्रश्‍नावर एकमत नाही
अमेरिकेने इराणकडून अण्वस्त्रविकास रोखण्याबाबत स्पष्ट हमी मागितली होती. तसेच, भविष्यात अण्वस्त्रनिर्मितीसाठी वापरता येणार्‍या तंत्रज्ञानावर निर्बंध आणण्याची मागणी केली होती. मात्र, इराणने या मागण्यांना आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरवले. या चर्चेतील सर्वात मोठा वादाचा मुद्दा म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी ठरला. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होते. इराणने या सामुद्रधुनीवर अधिक नियंत्रण ठेवण्याचा आग्रह धरला, तर अमेरिकेने ती आंतरराष्ट्रीय मार्ग असल्याचे ठामपणे सांगितले.

COMMENTS