Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेगभाजपकडून कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षकपदी नियुक्ती

नवी दिल्ली ः बिहारमधील राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीने नवे वळण घेतले आहे. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय

महिलांना त्यांच्या हक्कांसाठी प्रतीक्षा करायला लावणे अयोग्य : पंतप्रधान मोदी
राजधानीत 9 जणांचा होरपळून मृत्यू; चार मजली इमारतीला आग लागून दुर्घटना
कच्च्या तेलाच्या किमती 17 टक्क्यांनी घसरल्या
कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान ने दो दिवसीय झारखंड प्रवास के दौरान किया  आदिवासी भाई-बहनों के आवास का निरीक्षण, स्व-सहायता समूह की बहनों से ...

नवी दिल्ली ः बिहारमधील राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीने नवे वळण घेतले आहे. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर राज्यातील सत्तासमीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची चाल खेळत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार, बिहारमधील पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यासाठी चौहान यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत नव्या नेतृत्वाचा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पक्षातील विविध गटांमध्ये समन्वय साधण्याची क्षमता आणि दीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेऊनच त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते. पाटणा येथे भाजप आणि जनता दल युनायटेडच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सत्तांतराच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी आघाडीत पुढील नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, नितीश कुमार यांनी अलीकडेच राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे राज्यात नव्या नेतृत्वाची निवड तातडीने करावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर चौहान यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती ही भाजपची रणनीती मानली जात आहे. एकंदरीत, बिहारमधील सत्ताकारणात पुढील काही दिवस निर्णायक ठरणार असून, आघाडीतील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

COMMENTS