Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कच्च्या तेलाच्या दराचा चार वर्षांतील उच्चांक;प्रति बॅरल 126 डॉलरचा ओलांडला टप्पा

तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी मोठी झेप घेतली असून त्या प्रति बॅ

होर्मुजच्या सामुद्रधुनीत युद्धाचा वणवा; भारतीय जहाजावर भीषण हल्ला, एक खलाशी शहीद तर १८ जण मृत्यूच्या दाढेत!
अरबी समुद्रात अमेरिका आणि इराण पुन्हा समोरासमोर; अमेरिकन नौदलाने इराणचे जहाज गोळीबार करून जप्त
अमेरिका–इराण तणाव आणि चीनचा प्रभाव !
दुनिया में मची खलबली! अमेरिका से लेकर भारत तक कच्चा तेल बना बाहुबली, बनाया  नया रिकॉर्ड | Crude Oil Prices Hit Record High: Rs 10,888 per Barrel and  WTI Above 116 dollars

तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी मोठी झेप घेतली असून त्या प्रति बॅरल 126 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक पातळी मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 126.20 डॉलरपर्यंत पोहोचल्याने ऊर्जा क्षेत्रात अस्थिरतेची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः जगातील महत्त्वाच्या समुद्री तेलवाहतुकीच्या मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव वाढल्याने बाजारपेठेत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी तेल खरेदीकडे कल वाढवला, ज्यामुळे दर झपाट्याने वाढले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, इराणी बंदरांवरील दबाव कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. इराणने अणुकार्यक्रमाबाबत भूमिका बदलल्याशिवाय निर्बंध शिथिल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भूमिकेमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्षांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत तेलाची किंमत 140 डॉलरपर्यंत जाणेही अशक्य नाही. अमेरिकेच्या धोरणांवर त्यांनी टीकाही केली. अमेरिकेने इराणविरोधातील कारवाईवर गेल्या दोन महिन्यांत तब्बल 25 अब्ज डॉलर खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. या खर्चात शस्त्रसामग्री, क्षेपणास्त्रे आणि लष्करी तैनातीचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले. या वाढत्या खर्चामुळे अमेरिकेवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या परिस्थितीचा परिणाम केवळ तेलदरांपुरता मर्यादित नसून जागतिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. जपानसारख्या आयात-आधारित अर्थव्यवस्थांवर याचा ताण वाढला असून येन चलन डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घसरले आहे. ऊर्जा आयात खर्च वाढल्याने व्यापार तुटीचा प्रश्‍न अधिक गंभीर होऊ शकतो.

भारत-इराण यांच्यातील राजनैतिक संवाद
भारत आणि इराण यांच्यातील राजनैतिक संपर्कही वाढले असून प्रादेशिक परिस्थिती, युद्धविराम आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. इराणकडून अमेरिकेच्या कारवायांवर नाराजी व्यक्त करण्यात आली असून, समुद्री सुरक्षेच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त करण्यात आली.

COMMENTS