Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

रक्त तपासणीच्या बहाण्याने 14 लाखांचा गंडा

मुंबई ः राजधानी दिल्लीनंतर आता मुंबईमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे.मुंबई गुन्हे शाखेला लोकांची फसवणूक करणार्‍या बनावट डॉक्

पत्नीसह 2 मुलींची गोळ्या घालून हत्या
राष्ट्रसेवेची अनुभूती मालपाणी परिवारात : स्वामी गोविंददेव गिरीजी
मग सामाजिक न्यायाचे काय ?

मुंबई ः राजधानी दिल्लीनंतर आता मुंबईमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याचे दिसून येत आहे.मुंबई गुन्हे शाखेला लोकांची फसवणूक करणार्‍या बनावट डॉक्टर टोळीला पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आम्ही युनानी तसेच आयुर्वेदिक डॉक्टर्स आहोत, असे भासवून लोकांची फसणवूक करणार्‍या टोळीचा गु्न्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एका प्रकरणात या टोळीने वयोरूद्ध व्यक्तीची 710 वेळा खोटी रक्त तपासणी करून साडे चौदा लाखांची फसवणूक केली आहे. ही धक्कादायक मुंबईत घडली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानूसार, त्यांच्या टीमने आतापर्यंत 4 जणांना या प्रकरणी अटक केली. या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दक्षिण मुंबईतील एका 61 वर्षीय व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली आहे. सदर वृद्ध व्यक्ती काही वर्षांपासून ट्रेमर आजाराने ग्रस्त आहे. 11 नोव्हेंबर रोजी ते काही कामानिमित्त नरिमन पॉइंट येथे गेले होते. तेथे त्यांना काही लोकांनी त्यांच्या शरीराचा थरकाप होत असल्याचे पाहून त्यांना त्यांच्या असलेल्या आजाराबद्गल विचारले आणि कोणत्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे अशी विचारणा केली. यानंतर या टोळीतील एका आरोपीचे स्वत:ची ओळख युनानी डॉक्टर अशी दिली आणि वृद्ध व्यक्तीची फसवणूक केली. मी हा आजार दोन तासांत बरा करू शकतो, असे खोट्या डॉक्टरकडून सांगण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक दीपक सुर्वे यांनी सांगितले की, वृद्ध व्यावसायिक हे आरोपीच्या जाळ्यात अडकलेत. एवढेच नव्हे तर त्यांनी आरोपींना आपल्या घरी नेले. त्यानंतर आरोपींनी उपचार करायचे अशा बहाण्याने त्यांना झोपायला सांगितले. त्यानंतर त्यांच्या हातापायावर धातूच्या कोनने जोरात दाबले. मेटलच्या दबावाने शरीराच्या हातापायावर रक्त साचले होते. पुढे आरोपीने रक्त साचलेल्या भागावर थोडेसे ब्लेडने कट लावले. शरीरातून थोडेसे रक्त येताच आरोपीने जिभेने मुलतानी माती लावली. ज्यामुळे रक्त हे पिवळे दिसायला लागले. यानतंर आरोपीने त्या वयोरूद्धास म्हटले की, तुमच्या शरीरात घाण साचली आहे. त्याकारणामुळे तुमचे रक्त पिवळे दिसत आहे, आता आम्ही ते बरे केले आहे. आजपासून तुमचा आजार पूर्णपणे नाहीसा झाला आहे. आरोपीने त्या दिवशी एकूण 710 वेळा व्यावसायिकाचे अशा पद्धतीने रक्त घेतले होते. त्याबदल्यात त्यांच्याकडून साडे चौदा लाख रुपये रोख रक्कम घेण्यात आली होती. त्यादरम्यान व्यावसायिकाने आरोपींकडून मोबाईल क्रमांकही घेतला होता.

असा लागला प्रकरणाचा सुगावा – या प्रकरणानंतर काही वेळाने व्यावसायिकास समजले की, आपला आजार हा जशाच तसा आहे. त्यानंतर त्यांनी त्या आरोपीस फोन लावला असता त्याचा फोन बंद आला. मात्र व्यावसायिकास आपल्यासोबत फ्रॉड झाल्याचे समजले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांची संपर्क साधला. मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने व्यावसायिकाचा मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज आणि काही तांत्रिक गोष्टींच्या मदतीने आरोपीचे लोकेशन ट्रॅक करण्यास सुरुवात केली. त्यातच वरिष्ठ निरिक्षक दीपक आणि समीर मुजावर यांना आरोपी मोहम्मद शेरू हा मालेगावात आढळून आला. त्याच्या चौकशीदरम्यान मोहम्मद नफीस शरीफ, मोहम्मद आसिफ निसार आणि मोहम्मद आसिफ शरीफ यांना भिवंडी, ठाणे आणि इतरत्र मनोर येथून अटक करण्यात आली. त्याच्या पोलीस चौकशीत त्याच्या आणखी दहा साथीदारांची नावे पोलिसांच्या समोर आली.

COMMENTS