Homeताज्या बातम्याअहमदनगर

अमेरिकेने पुन्हा युद्धविराम वाढवलाइराणने अटी स्वीकारण्यास दिला नकार

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर युद्धविरामाची मुदत संपण्याच्या काही तास आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्

भारत-यूएईमध्ये एलपीजी पुरवठ्याचा करार5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणाहोर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित राहणे महत्वाचे : पंतप्रधान मोदी
युद्धविरामानंतरही तोडगा नाहीच ?
इस्रायल-हिजबुल्ला संघर्ष पुन्हा भडकलायुद्धविरामानंतरही हल्ल्यांची मालिका सुरू


वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर युद्धविरामाची मुदत संपण्याच्या काही तास आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्याची घोषणा केली. इराणकडून एकसंघ आणि अधिकृत प्रस्ताव सादर होईपर्यंत ही तात्पुरती शांती कायम ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी सांगितले की, इराणमधील अंतर्गत मतभेद लक्षात घेता तेथील सत्ताधार्‍यांना एकमताने भूमिका मांडण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे अमेरिकेने प्रथमच कोणतीही ठोस कालमर्यादा न ठरवता प्रतीक्षेची भूमिका घेतली आहे. इराणकडून ठोस प्रस्ताव येईपर्यंत लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, मात्र संरक्षण यंत्रणा पूर्ण सज्ज राहील, असेही त्यांनी अधोरेखित केले. युद्धविराम वाढवला असला तरी होर्मूज सामुद्रधुनी परिसरातील इराणच्या किनारी हालचालींवर निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तणाव पूर्णपणे शमलेला नसून परिस्थिती अजूनही संवेदनशील असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानने युद्धविराम वाढवण्याच्या निर्णयाचे स्वागत करत राजनैतिक प्रयत्नांना चालना मिळाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, चर्चेद्वारे तोडगा काढण्यासाठी ही संधी महत्त्वाची आहे. इस्लामाबाद येथे होणार्‍या चर्चेच्या पुढील टप्प्यात दीर्घकालीन शांतता कराराची दिशा मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पश्‍चिम आशियातील या संघर्षात मध्यस्थीची भूमिका बजावण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न दिसून येत आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विश्‍वासार्हता वाढवण्याची ही संधी मानली जात आहे.

चर्चेच्या अटींवरून तणाव तीव्र
युद्धविराम वाढवण्याच्या घोषणेनंतर काही वेळातच इराणने अमेरिकेच्या अटींना स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने परिस्थिती पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली किंवा अटींवर आधारित चर्चा स्वीकारली जाणार नाही, अशी ठाम भूमिका इराणने घेतली आहे. या घडामोडींमुळे अमेरिका-इराण संबंधांतील अविश्‍वास अधिकच वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीत तीन जहाजांवर गोळीबार
होर्मुझच्या सामुद्रधुनीत बुधवारी किमान तीन व्यापारी जहाजांवर गोळीबार व हल्ल्याच्या घटना घडल्याने आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. सागरी सुरक्षा यंत्रणा तसेच युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (यूकेएमटीओ) यांनी या घटनांची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या ईशान्येकडील समुद्री हद्दीत लायबेरियन ध्वज असलेल्या एका कंटेनर जहाजावर गोळीबारासह रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजाच्या नियंत्रण कक्षाचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.याच परिसरात, इराणच्या किनार्‍यापासून सुमारे आठ सागरी मैल अंतरावर पनामाचा ध्वज असलेल्या दुसर्‍या जहाजालाही लक्ष्य करण्यात आले.

COMMENTS