Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प.बंगाल, तामिळनाडूत आज मतदानईव्हीएमशी छेडछाड केल्यास कठोर कारवाई : निवडणूक आयोगाचा इशारा

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडू राज्यांमध्ये आज गुरूवारी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे.पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप

शिक्षक म्हणजे संस्कार व सामाजिक मुल्यांचा प्रवाह  -संजय सपकाळ
स्वारातीम विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे राष्ट्रीय परीक्षेत घवघवीत यश29 विद्यार्थी जी-पॅट / गेट 2026 मध्ये पात्र
राज्यात रक्तपात घडवण्याचे काम सुरू ः पटोले


नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडू राज्यांमध्ये आज गुरूवारी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे.पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मंगळवारी सायंकाळी प्रचार थांबला. गुरुवारी 16 जिल्ह्यांतील 152 जागांसाठी मतदान होणार असून, या टप्प्यात 1478 उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे 3.6 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तमिळनाडूमध्येही 234 जागांसाठी एकाच टप्प्यात आज मतदान होणार असून, आता सर्वांचे लक्ष मतदान प्रक्रियेकडे लागले असून शांततापूर्ण आणि पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत असून मतदारांची संख्या 5.57 कोटी आहेत. यापैकी तब्बल 20.72 टक्के म्हणजेच एक कोटी 17 लाख 51 हजार मतदार हे 18 ते 29 वयोगटातील आहेत. त्यामुळे युवा मतदारांची मते निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेची पवित्रता अबाधित राखण्यासाठी मतदान यंत्रांशी कोणतीही छेडछाड सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. मतदान यंत्रावरील बटणांवर अत्तर, चिकट द्रव्य किंवा इतर कोणताही पदार्थ लावणे ही गंभीर स्वरूपाची छेडछाड मानली जाईल आणि त्यास निवडणूक गुन्ह्याचा दर्जा दिला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. अलीकडे काही ठिकाणी मतदान कोणाच्या बाजूने झाले आहे का हे तपासण्याच्या उद्देशाने मतदान यंत्रावरील बटणांवर अत्तर किंवा चिकट द्रव्य लावण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर आयोगाने अशा कृत्यांना पूर्णपणे बेकायदेशीर ठरवत त्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार, कोणत्याही मतदान केंद्रावर अशी घटना आढळल्यास संबंधित पीठासीन अधिकार्‍याने तात्काळ वरिष्ठ अधिकार्‍यांना कळवणे बंधनकारक आहे. आवश्यक वाटल्यास त्या केंद्रावर पुनर्मतदान घेण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रावरील सर्व बटणे स्वच्छ आणि स्पष्ट ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यंत्रावर टेप, चिकट पदार्थ, रंग, शाई लावणे गुन्हा
यंत्रावरील कोणत्याही बटणावर टेप, चिकट पदार्थ, रंग, शाई किंवा इतर रासायनिक द्रव्य लावलेले नसावे, याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे मतदानाची गोपनीयता धोक्यात येऊ शकते, असे आयोगाने नमूद केले आहे.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज गुरूवारी मतदान होत आहे. दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले असले तरी, काही उमेदवारांमुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकलेली नाही. बारामतीत महाविकास आघाडीने उमेदवार न देता राष्ट्रवादी काँगे्रसला पाठिंबा जाहीर केला आहे. तर राहुरीत शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने उमेदवार दिल्याने ही निवडणूक रंगतदार होतांना दिसून येत आहे.

COMMENTS