Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शौचालय घोटाळा प्रकरणात संजय पानसरेंना अटक

मुंबई ः नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमधील शौचालय घोटाळाप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली आहे. 7

राजकारण की सत्तेचा तमाशा!
पुण्यात राज्य उत्पादन शुल्कने वर्षभरात 12 कोटींचा मुद्देमाल जप्त
शिवसेना नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते यांना हटवले

मुंबई ः नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटमधील शौचालय घोटाळाप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली आहे. 7 कोटींच्या या शौचालय घोटाळा प्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणातील 7 अधिकारी फरार आहेत. संजय पानसरे यांच्यासह 7 अधिकार्‍यांचा मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एपीएमसी मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक केली. तर कांदा बटाटा बाजार समितीचे माजी संचालक अशोक वाळुंज यांची पोलिसांनी चौकशी केली. तर या प्रकरणात अन्य संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणात सातार्‍याचे शरद पवार गटाचे नेते आणि लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. एपीएमसी मार्केट परिसरातील शौचालय चालवण्यासाठी देण्यात येणार्‍या कंत्राटामध्ये कमी दरामध्ये कंत्राट देत शासनाचे 7 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करत नवी मुंबईच्या गु्न्हे शाखेने तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आतापर्यंत तीन जणांना अटक केली होती. त्यानंतर आता संजय पानसरे यांना अटक केली. याप्रकरणात आतापर्यंत 4 जण अटकेत आहेत. तर पोलिसांनी अशोक वाळुंज यांची देखील चौकशी केली. अटक करण्यात आलेले संजय पानसरे हे एपीएमसी मार्केटमधील संचालकांपैकी सर्वात मोठे संचालक आहेत. त्यांच्या अटकेनंतर आता इतर संचालक देखील घाबरले आहेत. दरम्यान, नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हे आशियातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मार्कट म्हणून ओळखले जाते. एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या शौचालयाच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. शौचालयाच्या कंत्राटामध्ये सरकारचे 7 कोटी 61 लाख 49 हजार 689 रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह आठ जणांवर आरोप करण्यात आला आहे. 2023 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

COMMENTS