Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अमेरिकेचा इराण युद्ध जिंकल्याचा दावा; इराणला अणुशक्ती राष्ट्र बनू देणार नसल्याचा ट्रम्प यांचा इशारा

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी देशाला संबोधित करत अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्ध जिंकल्याचा दावा करत, पुढील

खरात संबंधीत सर्व खाती गोठवली; समतातील सर्व व्यवहार पारदर्शी : संदीप कोयटे
वारकरी परंपरेचे ज्येष्ठ जयसिंगराव गट यांचे निधन
सहकारी संस्थेचा कारभार काटकसरीसह चिकाटीने चालवा : राजेंद्र नागवडे

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी देशाला संबोधित करत अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्ध जिंकल्याचा दावा करत, पुढील दोन ते तीन आठवड्यांत निर्णायक घडामोडी होऊ शकतात, असा संकेत देतानाच त्यांनी इराणने कराराचा मार्ग स्वीकारला नाही तर अत्यंत कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सांगितले की, इराणची क्षेपणास्त्र, मानवरहित यंत्रणा आणि नौदल क्षमतांवर मोठा आघात करण्यात आला असून त्यांची लष्करी ताकद लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या कारवाईचे प्रमुख उद्दिष्ट साध्य होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच इराणमध्ये सत्तास्थरावर बदल झाल्याचेही त्यांनी नमूद केले आणि नवीन नेतृत्व पूर्वीपेक्षा कमी आक्रमक असल्याचा दावा व्यक्त केला. ट्रम्प यांच्या 19 मिनिटांच्या भाषणात त्यांनी इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणावर खिळखिळी केल्याचा दावा करतांना म्हटले की, इराणला अणुशक्ती राष्ट्र बनू दिले जाणार नाही. करार न झाल्यास कठोर लष्करी पर्याय वापरण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी इतर देशांनी उचलावी, असेही ते म्हणाले. तसेच सौदी अरेबिया आणि बहरीन यांसारख्या मित्रदेशांच्या सुरक्षेबाबत अमेरिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, या भाषणात कोणतीही ठोस नवी घोषणा करण्यात आली नाही. याआधी मांडलेल्या भूमिकांचीच पुनरावृत्ती झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे. युद्धाचा कालावधी आणि खर्च याबाबत चिंतेत असलेल्या नागरिकांना त्यांनी पूर्वीच्या संघर्षांचा दाखला देत संयम राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान, अमेरिकेच्या दाव्यांना प्रत्युत्तर देताना इराणने आपली लष्करी क्षमता अजूनही अबाधित असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, लक्ष्य करण्यात आलेली ठिकाणे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची नव्हती. प्रगत शस्त्रास्त्रांची मुख्य केंद्रे सुरक्षित असून, गरज भासल्यास आपली खरी ताकद दाखवण्यास ते सक्षम असल्याचा इशारा देण्यात आला. इराणचे संरक्षण मंत्री अमीर हातामी यांनीही स्पष्ट केले की, शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. भूमीवरून हल्ला झाल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


हॉर्मुझ प्रश्‍नावर ब्रिटनने बोलवली 35 देशांची बैठक
हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या प्रश्‍नावर ब्रिटनने 35 देशांची आभासी बैठक बोलावली आहे. या बैठकीत विविध देशांचे प्रतिनिधी सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या पर्यायांवर चर्चा करणार आहेत. मात्र, भारतासह काही महत्त्वाच्या देशांना या प्रक्रियेबाहेर ठेवण्यात आल्याने चर्चेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS