Homeताज्या बातम्यामनोरंजन

हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने व्हायरल व्हिडिओवर दिलं उत्तर

अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. याआधी अनेकदा वयातील अंतरावरून या दोघांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. आता सब

वडिलांच्या स्मरणार्थ गावासाठी बांधून दिला साडेपाच लाखाचा सभामंडप
बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर मंजूर
दूध दरवाढीसाठी कर्जत तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

अभिनेता हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. याआधी अनेकदा वयातील अंतरावरून या दोघांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. आता सबा तिच्या एका फॅशन शोमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. सबाने नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये हजेरी लावली होती. फॅशन शोमध्ये सहसा मॉडेल्स रॅम्पवर चालताना दिसतात. मात्र सबा रॅम्पवर चक्क नाचताना दिसली होती. तिचा हा अंदाज काहींना खूपच ‘कूल’ वाटला तर काहींना तिचा डान्स आणि रॅम्पवर तिचं वागणं विचित्र वाटलं. यावरूनच नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘तुला थेरपीची गरज आहे’, ‘तू वेडी आहेस का’ असे असंख्य कमेंट्स सबाच्या व्हिडीओवर पहायला मिळत आहेत. त्यावर आता खुद्द सबाने मौन सोडलं आहे. सबाचा रॅम्प डान्स पाहून अनेकांनी तिला इन्स्टाग्रामवर मेसेजसुद्धा केले आहेत. त्यापैकीच दोन मेसेजेसना सबाने सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. ‘तुला थेरपीची गरज आहे’, असं म्हणणाऱ्याला सबाने उत्तर दिलं, ‘होय सर/मॅडम. मी तुमच्याशी सहमत आहे आणि मी नियमितपणे थेरपी घेते. या द्वेषपूर्ण जगात प्रत्येकाने ते केलं पाहिजे. तुम्हीसुद्धा घेऊन पहा. तुम्हाला तुमची स्वत:ची टाकी भरण्यास मदत होईल आणि त्यामुळे इतरांच्या शांततापूर्ण अस्तित्वामुळे तुम्ही नाराज होणार नाही.’

COMMENTS