पाटोदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा अभू

पाटोदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शिबिरात रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिक मिळून तब्बल ६५ हजारांहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली.
शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी आमदार सुरेश धस, जयदत्त धस, सागर धस तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर परिश्रम घेत रुग्णांना मार्गदर्शन व आवश्यक ती मदत केली. यावेळी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, निदान व उपचारांचा लाभ मिळाल्याने या महाआरोग्य शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

COMMENTS