Homeताज्या बातम्या

पेठ बीड पोलीस ठाण्याच्या दोन अंमलदारांचा पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते गौरव

बीड : पेठ बीड पोलीस ठाण्याचे अंमलदार अल्ताफ अमीन शेख आणि शिवाजी एकनाथ राख यांच्या तत्पर, धाडसी व कर्तव्यदक्ष कामगिरीची पोलीस महासंचालकांनी दखल घे

कोटग्याळ-माचनूर पुलावरून पाण्याचा वेग वाढला; माचनूर-कुंडलवाडी मार्गावरील वाहतूक बंद
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच व्हावी : सावंत
थायलंडच्या शाळेत भीषण गोळीबार; एका शिक्षकासह ७ जणांचा मृत्यू, २० जखमी

बीड : पेठ बीड पोलीस ठाण्याचे अंमलदार अल्ताफ अमीन शेख आणि शिवाजी एकनाथ राख यांच्या तत्पर, धाडसी व कर्तव्यदक्ष कामगिरीची पोलीस महासंचालकांनी दखल घेत त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

२ ऑगस्ट रोजी डायल ११२ वर अल्पवयीन मुलीला मारहाण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच अंमलदार अल्ताफ अमीन शेख आणि शिवाजी एकनाथ राख यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तडीपार आरोपी भिमा लक्ष्मण मस्के आढळून आला. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असता आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केला. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, संवेदनशील परिस्थितीत दाखविलेली तत्परता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठेबद्दल अंमलदार अल्ताफ अमीन शेख व शिवाजी एकनाथ राख यांच्या कामगिरीची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते दोन्ही अंमलदारांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या गौरवामुळे पेठ बीड पोलीस ठाण्याच्या अंमलदारांच्या कर्तव्यदक्षतेचे आणि तत्पर पोलिसिंगचे कौतुक होत आहे.

COMMENTS