पाटोदा : पाटोदा नगरपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत या कामाच

पाटोदा : पाटोदा नगरपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत या कामाची तातडीने चौकशी करण्याची मागणी किशोर सुरेश उपदेशी यांनी केली आहे. कामाची तांत्रिक गुणवत्ता तपासून संबंधितांवर कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
किशोर उपदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंबेडकर उद्यानाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून कामाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली आहे. याबाबत यापूर्वी नगरपंचायत पाटोद्याचे मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून स्पॉट पंचनामा करण्यात यावा, कामाची गुणवत्ता तांत्रिकदृष्ट्या तपासावी तसेच सक्षम अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच मुख्याधिकारी, नगरपंचायत पाटोदा यांना देण्यात आले आहे.

COMMENTS