Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

नांदेड : नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी बसले असून भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील पांगरा श

गुड न्यूज! महाराष्ट्रात आता दरवर्षी वीज बिल कमी होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
गारपीटग्रस्त भागांची खा. नीलेश लंकेंकडून पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ; तातडीच्या मदतीची मागणी
जामखेडमध्ये गोळीबारात जखमी झालेल्या पैलवान सागर मोहोळकरचा उपचारादरम्यान मृत्यू
4.7 magnitude earthquake hits parts of Maharashtra; tremors felt in Hingoli,  Nanded and Parbhani districts | DD News On Air

नांदेड : नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी बसले असून भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा शिंदे परिसरात शनिवारी भूकंपाचे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून त्याचे केंद्र पांग्रा शिंदे येथे असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.
भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर इतकी असल्यामुळे त्याचे धक्के आसपासच्या भागातही स्पष्टपणे जाणवले. सकाळच्या सुमारास अचानक जमिनीला कंप व हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेत सुरक्षित स्थळी आश्रय घेतला. या संदर्भात श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल-अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी सांगितले की, हा भूकंप मध्यम तीव्रतेचा असून सध्या मोठ्या नुकसानीची शक्यता कमी आहे.

COMMENTS