Homeताज्या बातम्या

आमदार रोहित पवारांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू; प्रकृती खालावली, शासनाला दिला ‘अल्टिमेटम’

पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'तील अटी शिथिल करण्यात याव्यात, य

कर्जमाफीच्या जीआरची होळी! जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र आक्रोश, सरसकट कर्जमाफीची मागणी!
पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कारवाई
विमलबाई जोशी यांचे निधन
Rohit Pawar Health: रोहित पवारांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत  डॉक्टरांकडून मोठी अपडेट, म्हणाले... | - News18 Marathi

पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी तसेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील अटी शिथिल करण्यात याव्यात, या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्याच्या विविध भागांतून पाठिंबा मिळत असून, शेतकरी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र दिसून आले.

सततच्या उपोषणामुळे रोहित पवार यांच्या प्रकृतीवर परिणाम जाणवू लागल्याची माहिती वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण (शुगर लेव्हल) कमी झाल्याचे सांगण्यात आले असून, रक्तदाब मात्र नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले.

आंदोलनस्थळी बोलताना रोहित पवार यांनी शासनावर कडक शब्दांत टीका करत, केवळ चर्चेच्या आश्वासनांवर विश्वास ठेवता येणार नसल्याचे म्हटले. कर्जमाफी योजनेतील जाचक अटी अधिकृतपणे मागे घेतल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला घरातूनच मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शासनाकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत असली, तरी आंदोलनाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

सरकारला ‘अल्टिमेटम’ आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. जर प्रशासनाने सकारात्मक निर्णय जाहीर केला नाही, तर आज (सोमवार, दि. १५ जून २०२६) सकाळी ते पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या ‘संत नामदेव पायरी’ येथे जाऊन आपले आंदोलन अधिक तीव्र करणार आहेत. या इशाऱ्यामुळे आता राज्याचा गृहविभाग आणि स्थानिक प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे.

COMMENTS