बीड : आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभापती बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक दत्ता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त

बीड : आ. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभापती बाळासाहेब गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक दत्ता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी असते, याचा प्रेरणादायी संदेश या उपक्रमांतून देण्यात आला.
दत्ता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल 201 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या सामाजिक भावनेतून नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यासोबतच आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान व आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची आरोग्य तपासणी करून विविध आजारांबाबत मार्गदर्शन केले. गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचे मोफत वितरणही करण्यात आले.
याचबरोबर गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटप, तसेच अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी अन्नदान करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपण्यात आला. या सर्व उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉक्टरांचे पथक, रक्तपेढीचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील सहकार्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित नागरिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी दत्ता सेठ जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले. आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभापती बाळासाहेब गुंजाळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समाजोपयोगी उपक्रमांमुळे वाढदिवस साजरा करण्याचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला.

COMMENTS