Homeताज्या बातम्या

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा पाटोदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध; तहसीलदारांना दिले निवेदन

पाटोदा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पाटोदा तालुक्यातील र

कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने स्व. अजित पवार यांना अभिवादन; त्यांच्या कार्याला वाहण्यात आली आदरांजली
जिल्हा बँक निवडणूक : माहूरमध्ये १०० टक्के मतदान; तिन्ही मतदारसंघांतील सर्व मतदारांनी बजावला हक्क
धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप पुण्यात शानूर भाई शेख यांच्या पुढाकारातून शिक्षणाला प्रोत्साहन; मान्यवरांची उपस्थिती

पाटोदा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा पाटोदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पाटोदा तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदन दिल्यानंतर पाटोदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध आंदोलन करत घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी असे गैरवर्तणुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य अजिबात खपवून घेतले जाणार नाही. भविष्यात जर कोणी असे वक्तव्य केले तर त्यास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

तालुकाध्यक्ष दीपक घुमरे यांनी याप्रसंगी बोलताना अत्यंत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब भराटे, बाजार समितीचे उपाध्यक्ष पांडुरंगतात्या नागरगोजे, राष्ट्रवादीचे नेते संतोषदादा जाधव, माजी सभापती अनिल जायभाय, कडा कारखान्याचे संचालक अंकुश मुंडे, सरपंच प्रभाकर कवठेकर, अशोक पवार, बंडू आरसूळ, अंगदशेठ भोंडवे, संजय घोशीर, अनिल दगडखेर, अण्णा शिंदे, राजेंद्र सकुंडे, नाना कवठेकर, डॉ. अनिल मिसाळ, अरविंद लवांडे, भगवान शिंदे, रामचंद्र मकाळ, अशोक बांगर, दादा जावळे, अजय गर्जे, राजपाल शेंडगे, अशोक गाडे, राहुल अडागळे, दीपक जाधव, सूरज गर्जे, श्रीहरी कोठूळे, सतीश खोटे, रामकृष्ण नांदे, दत्ता सरवदे, संजय मनमोडे, लहू मनमोडे, ज्ञानेश्वर पाचपुते, अजिनाथ फाळके यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS