Homeताज्या बातम्या

बीरभूममध्ये पोलिसांचा मोठा छापा; २८.५ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त, बस चालक ते दगड माफिया मिनार मंडल जेरबंद

बीरभूम: पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत २८.५ कोटींहून अधिक रुपयांची रोख रक्कम आणि १५ किलो सोने जप्त केले

आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; नागरिक संतप्त, लोकप्रतिनिधींवर दुर्लक्षाचा आरोप
पंकजाताईंच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या कला क्षेत्राला पाठबळ; डॉ. योगेश क्षीरसागरांकडून ‘नादवेध’ संगीत महोत्सवाचे आयोजन
कुंडलवाडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
West Bengal Police Seize ₹28.5 Crore Cash, 15 Kg Gold From Ex-Bus Driver's  House In Birbhum - VIDEO

बीरभूम: पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कारवाईत २८.५ कोटींहून अधिक रुपयांची रोख रक्कम आणि १५ किलो सोने जप्त केले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे २१.५ कोटी रुपये असून, त्यामुळे एकूण जप्ती तब्बल ५० कोटी रुपयांची झाली आहे. विशेष म्हणजे नोटांचा ढीग इतका मोठा होता की, त्यांची मोजणी करताना पोलिसांची पाच मोजणी यंत्रे बंद पडली.

माजी बस चालक ते दगड माफियाचा व्यवस्थापक

या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी मिनार मंडल याला अटक केली आहे. तो पूर्वी राज्य परिवहन विभागात बस चालक म्हणून कार्यरत होता आणि नंतर दगडांच्या अवैध व्यापारात सामील झाला. आरोपी मिनार मंडल हा सध्या फरार असलेला दगड व्यावसायिक तुलू मंडल उर्फ मोहम्मद नजीबुद्दीन याचा व्यवस्थापक आणि मेहुणा आहे. तुलू मंडल हाच तो व्यावसायिक आहे, ज्याने २०२४ मध्ये आपल्या मुलीच्या लग्नावर तब्बल १०० कोटी रुपये खर्च केले होते. तुलू मंडल हा माजी टीएमसी नेते अनुब्रता मंडल यांचा अत्यंत जवळचा मानला जातो.

रात्रभर चालली नोटांची मोजणी

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री मिनार मंडलच्या घरावर छापा टाकला. सुरुवातीला २० कोटी रुपयांची रोकड सापडली, मात्र रात्रभर चाललेल्या मोजणीनंतर जप्त रकमेचा आकडा २८.५ कोटींवर पोहोचला. ही रोकड धातूच्या पेट्यांमध्ये भरून मोहम्मद बाजार पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहे. याशिवाय घरातून १-१ किलो वजनाच्या १४ सोन्याच्या वळ्या आणि १०० ग्रॅमची १० सोन्याची बिस्किटे (एकूण १५ किलो सोने) जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान मिनार मंडलने ही सर्व मालमत्ता तुलू मंडलची असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

COMMENTS