Homeताज्या बातम्या

नांदेड विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली; काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर यांची उमेदवारी

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस पक्षाकडून रामदास पाटील सुमठ

नांदेड विधानपरिषद रणसंग्राम : चव्हाणांचे ‘चाणक्य’ राजूरकर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर; महायुतीतील छुप्या संघर्षाचीही चर्चा
राजकीय रंगमंचावर मैत्रीचे सूर; संगीत संध्येत विरोधकांच्या गप्पांची रंगली मैफल
विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले

नांदेड : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस पक्षाकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे.

सुमठाणकर यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसने या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) अमरनाथ राजूरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे.

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांशिवाय या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून माधवराव पाटील जवळगावकर, ज्योतिबा खराटे, पंकज गायकवाड, प्रशांत इंगोले आणि कृष्णा पाटील यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात अनेक उमेदवार आमनेसामने ठाकल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी ४ जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतरच निवडणुकीचे अंतिम आणि खरे चित्र स्पष्ट होईल. राजकीय वर्तुळात या चुरशीच्या लढतीकडे आता सर्वांचे उत्सुकतेने लक्ष लागले आहे.

COMMENTS