Homeताज्या बातम्या

गायिका अलका याज्ञिक पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्या

कार्यकाळ संपल्याने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा
राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवानप्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान
जोर्वे येथील यशदीप दिघे आर्मीमध्ये ‘लेफ्टनंट’पदी; डेहराडून येथील एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण, लेह-लडाखमध्ये होणार तैनात
Padma Awards 2026: अलका याज्ञिक यांना पद्मभूषण, पण प्रकृतीने वेधलं लक्ष;  सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचल्या व्यासपीठावर | Navarashtra

नवी दिल्ली : पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथील सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन १९९० आणि २००० च्या दशकात त्यांनी अगणित हिट गाणी हिंदी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. ‘खलनायक’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘ताल’ यांसारख्या एकापेक्षा एक चित्रपटांमधील अविस्मरणीय गाण्यांना त्यांनी आपला स्वरसाज दिला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात पद्म पुरस्कार प्रदान केले. यामध्ये एकूण ६५ पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये २ पद्मविभूषण, ७ पद्मभूषण आणि ५६ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. पुरस्कारार्थींमध्ये गायिका अलका याज्ञिक, अभिनेते ममूटी, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि आर. माधवन यांचा समावेश आहे.

अलका याज्ञिक या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय पार्श्वगायिकांपैकी एक मानल्या जातात. गेली अनेक दशके त्यांनी आपल्या मधुर आवाजाने कोट्यवधी संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत. अलका याज्ञिक यांनी त्यांच्या कारकिर्दीत हजारो गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांच्या अनेक गाण्यांनी लोकप्रियतेचे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या अलका याज्ञिक यांच्या नावावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अलका याज्ञिक यांनी हा सन्मान अत्यंत नम्रतेने स्वीकारला.

COMMENTS