बँकॉक : थायलंडमधून जगाला हादरावणारी घटना समोर आली असून राजधानी बँकॉकमधील देबसिरिन नोनथाबुरी या खासगी शाळेत एका विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार के

बँकॉक : थायलंडमधून जगाला हादरावणारी घटना समोर आली असून राजधानी बँकॉकमधील देबसिरिन नोनथाबुरी या खासगी शाळेत एका विद्यार्थ्याने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या दुर्दैवी घटनेत एका शिक्षकासह सात जणांचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण थायलंडमध्ये तीव्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी होता. त्याने अचानक शाळा परिसरात प्रवेश करून गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. नोथांबुरी प्रांतातील पोलीस कमांडर लेफ्टिनंट कर्नल डेचरापी कोंगाडी यांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिला आहे. ही संपूर्ण घटना बँकॉकच्या नोंथाबुरी प्रांतातील बँग क्रुआई जिल्ह्यात घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे ३,००० विद्यार्थी क्षमता असलेल्या या शाळेतील बहुतांश विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. थायलंडचे शिक्षणमंत्री प्रसर्ट यांनी घटनेची माहिती घेत बचावकार्याचा आढावा घेतला आहे. या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS