इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड- २०२१ मिळाल्याबद्दल ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चित्रकार राहूल भालेराव यांचा सत्कार

Homeताज्या बातम्याअहमदनगर

इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड- २०२१ मिळाल्याबद्दल ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चित्रकार राहूल भालेराव यांचा सत्कार

संगमनेर / प्रतिनिधी चित्रकार व रांगोळीकार राहूल भालेराव यांना २०२१ चा 'इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड' मिळाल्याबद्दल राज्याचे महसूलमंत्री मा. ना. बाळासाहे

संगमनेरमध्ये डॉक्टर विरोधात पोक्सो गुन्हा
अनाथ बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्ह्यात टास्क फोर्स
नेवासा येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

संगमनेर / प्रतिनिधी

चित्रकार व रांगोळीकार राहूल भालेराव यांना २०२१ चा ‘इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल राज्याचे महसूलमंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. सुधीरजी तांबे व अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष मा. अमितजी पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

समर्पणभाव, श्रद्धा व मेहनतीने विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या गुणवंतांना निर्वाण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेकडून इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड दिला जातो. संगमनेर येथील अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले चित्रकार राहूल भालेराव यांची २०२१ मधील कला क्षेत्रातील योगदानाबद्दल या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नाशिक येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात मिसेस इंडिया शिल्पी अवस्थी व आफ्रिकेतील सामाजिक कार्यकर्ते सनासी बायडोम यांच्या हस्ते हा पुरस्कार भालेराव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी निर्वाण फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश आंबेडकर व सामाजिक कार्यकर्त्या आरती हिरे या देखील उपस्थित होत्या. चित्रकलेसोबतच रांगोळी कलेवरही राहूल यांचे विशेष प्रभुत्व आहे. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी राहुल भालेराव यांनी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेले थोरात यांचे हुबेहूब चित्र हा तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला होता.

      हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ना. बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. डॉ. सुधीरजी तांबे, सौ . शरयूताई देशमुख , अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित , मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे  व उपस्थित मान्यवरांनी भालेराव यांचे अभिनंदन केले. तसेच संगमनेर परिसरातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS