Homeताज्या बातम्या

श्री शाहू विद्यामंदिर शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्री शाहू विद्यामंदिर खडांबे शाळेतील विद्यार्थी शौर्य राहुल लोंढे व आयुष प्रदीप कल्हापुरे यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यश संपादन केले.अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत शौर्य राहुल लोंढे याने 234 गुण व आयुष प्रदीप कल्हापुरे याने 234 गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती प्राप्त केली. या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या मिशन आरंभ परीक्षेतही जिल्हास्तरावर उत्तुंग यश मिळवले.तसेच डॉ. सी.व्ही.रमण बालवैज्ञानिक परीक्षेत जिल्हास्तरावर विद्यार्थ्यांची निवड होऊन ते इस्रो सहलीसाठी  पात्र झालेले आहेत. मंथन, लक्षवेध, सावित्रीमाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेत तसेच नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये येऊन आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ऍड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार ऍड. दीपलक्ष्मी म्हसे, विद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब शिंदे, पर्यवेक्षक दिलीप भोरुंडे व इतर शिक्षकांनी तसेच शालेय व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेवगाव रोटरीच्या अध्यक्षपदी डॉ. बिहाणी, लोंढे सचिव
पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान
सोनई परिसरात दमदार पावसाची हजेरी 

COMMENTS