Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शारदा संकुलात डॉ. आंबेडकरांना अभिवादन  

राहाता : रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले ह

माकेगावात शेतीच्या वादातून चुलत्यावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
‘सोमैया’च्या 20 विद्यार्थ्यांची आयटी कंपनीत निवड
अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा प्रश्न मार्गी लागणार : वाकचौरे
रयत शिक्षण संस्थेच्या शारदा संकुलात एज्युटॉप स्कुल व शारदा विद्यालय ऑनलाईन  प्रवेश सुरू – प्रा.शिंदे -

राहाता : रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पर्यवेक्षिका कमल साबळे यांनी प्रास्ताविक केले. शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे तसेच विद्यालयाचे प्राचार्य शिला संसारे, मुख्याध्यापक राजकुमार साळवे, इंग्लिश मीडियमच्या प्रिन्सिपल निशा चेंगोट, प्रा.शरद गमे, प्रा. बाळासाहेब दिघे, पंकज दिघे, शारदा विद्या मंदिरचे शिक्षक वृंद, शारदा कन्या विद्या मंदिर सर्व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्नेहल बिडवे,श्रेया बिडवे यांनी मनोगते व्यक्त केली. त्यातून बाबासाहेबांचा जीवनपट विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मांडला.
विद्यालयातील शिक्षिका सोनाली थोरात यांनी बाबासाहेबांचे सामाजिक शैक्षणिक कार्य व शिक्षणाबद्दल महत्व सांगितले. तसेच बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे आणि चंद्र,सूर्य,तारे असेपर्यंत बाबासाहेबांचे विचार समाजाला प्रेरणा देण्याचं काम करत राहील असे मत मांडले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात रमेश शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन सर्व समाजाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले, त्याचबरोबर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला कामगार वर्ग शेतकरी वर्ग या सर्व घटकांना एकत्रित करण्याचं काम व दिशा देण्याची महत्त्वाचे काम बाबासाहेबांनी केलं अशा या महामानवास विनम्र अभिवादन केले. सूत्रसंचालन बेबी कारभारी केले. यानंतर निलोफर पठाण यांनी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS