Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकावर हल्ला करणार्‍या दोन आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा 10 हजार रूपये दंडाची शिक्षा

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती.एस.जे.घरत यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या सत्र खटला क. 44 / 2012, महाराष्ट्र

समोसा खाताय सावधान… पहा व्हीडीओ… (Video)
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान
पाणबुडी मोटार चोरी करणारे जेरबंद

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश श्रीमती.एस.जे.घरत यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या सत्र खटला क. 44 / 2012, महाराष्ट्र शासन वि.अविनाश कु-हाडे व ईतर या प्रकरणातील आरोपींनी फिर्यादी युवराज जगन्नाथ माने, (रा.खडकपुरा, अंबाजोगाई जि.बीड) यांस गाडीला का कट मारला या कारणावरून जिवे मारण्याच्या उद्देश्यावरून पोटात चाकु मारून गंभीर दुखापत केली. त्यामुळे आरोपींना मा.न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड ठोठावला.
थोडक्यात हकिकत अशी की दि. 25/01/2012 सांयकाळी अंदाजे सव्वासात वाजेचे सुमारास किशोर लोमटे याचे मेडीकल वरील मुलगा नामे प्रदीप महाळंगे यास तु आमच्या गाडीला कट का मारलास म्हणुन आरोपींनी आरोपी नामे विनोद शिंदे व अविनाश कु-हाडे हे त्यास मारहाण करू लागले. त्यावेळी किशोर लोमटे हा त्यास सोडविण्याकरीता गेला असता त्यास आरोपी नामे विनोद शिंदे याने चाकुने त्याच्या पोटात मारून गंभीर जखमी केले. यावरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. 12/2012 गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हयाच्या तपास होवून आरोपींविरूध्द मा.न्यायालयात कलम 307, 323, 504, 34 भा.दं.वी. प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले व त्यात जखमी किशोर लोमटे तसेच स्वामी विवेकानंद हॉस्पीटल, लातुर येथील डॉ.ढगे यांची साक्ष महत्वाची ठरली. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.लक्ष्मण फड यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा अशा प्रकारचा निकाल अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.एस.जे.घरत यांनी दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. लक्ष्मण फड यांनी काम पाहीले व त्यांना अ‍ॅड.अजित लोमटे यांनी सहकार्य केले. दरम्यान आरोपीनी यातील फिर्यादीवर केलेल्या केस मध्ये फिर्यादी युवराज माने व ईतर एक यांची मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.सदर प्रकरणाचा तपास पो.उपनिरीक्षक सयद अहमद सयद अब्बास यांनी केला व तसेच पोलीस पैरवी म्हणून पो.कॉ.बाबुराव सोडगीर व स.फौ. चार्ल्स फेलिक्स व्ही.फ्रान्सीस यांनी काम पाहीले.

COMMENTS