कर्जत : तालुक्यातील खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (दि. २६) पासून बेमुदत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले असून यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. दरम्यान कर्जत तालुका असोसिएशनच्या वतीने सरकारने तात्काळ लक्षणे घातल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्याचे निवेदन त्यांनी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे. यावेळी अध्यक्ष विक्रम गदादी, सचिव प्रफुल्ल बरबडे, खजिनदार विशाल फडतरे, उपाध्यक्ष पोपट सुद्रिक, संकेत पाटील, नितीन भोईटे, सुभाष गांगर्डे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. याबाबत कर्जत तालुका सीड्स फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२६ संदर्भात युरिया व डीएपी खतांच्या वितरण कार्यपद्धतीबाबत शासनाने फेरविचार करावा. तसेच मुदतबाह्य कीटकनाशक उत्पादक कंपन्यांकडून परत घेण्याबाबत ठोस धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यात बाहेरून येणाऱ्या उद्योजकांकडून बेकायदेशीर साठा करून कीटकनाशकांची विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाने कृषी विभागामार्फत २०२५ च्या नवीन बियाणे कायद्यात विक्रेत्यांसाठी असलेले कठोर नियम शिथिल करावेत, अशीही मागणी आहे. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रश्नांमुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे अडचणीत सापडली असून आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, पुढील आठ दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रे सोमवार, २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खत व कीटकनाशके उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कर्जत : तालुक्यातील खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार (दि. २६) पासून बेमुदत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले असून यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे. दरम्यान कर्जत तालुका असोसिएशनच्या वतीने सरकारने तात्काळ लक्षणे घातल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्याचे निवेदन त्यांनी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे. यावेळी अध्यक्ष विक्रम गदादी, सचिव प्रफुल्ल बरबडे, खजिनदार विशाल फडतरे, उपाध्यक्ष पोपट सुद्रिक, संकेत पाटील, नितीन भोईटे, सुभाष गांगर्डे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. याबाबत कर्जत तालुका सीड्स फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगाम २०२६ संदर्भात युरिया व डीएपी खतांच्या वितरण कार्यपद्धतीबाबत शासनाने फेरविचार करावा. तसेच मुदतबाह्य कीटकनाशक उत्पादक कंपन्यांकडून परत घेण्याबाबत ठोस धोरण राबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, राज्यात बाहेरून येणाऱ्या उद्योजकांकडून बेकायदेशीर साठा करून कीटकनाशकांची विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाने कृषी विभागामार्फत २०२५ च्या नवीन बियाणे कायद्यात विक्रेत्यांसाठी असलेले कठोर नियम शिथिल करावेत, अशीही मागणी आहे.
विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रश्नांमुळे जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रे अडचणीत सापडली असून आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, पुढील आठ दिवसांत योग्य निर्णय न झाल्यास अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विक्री केंद्रे सोमवार, २७ एप्रिल २०२६ पासून बेमुदत बंद ठेवण्यात येतील, असा इशारा संघटनेने दिला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खत व कीटकनाशके उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS