कर्जत : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालात दादा पाटील महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत मुलींनीच आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य या चारही विभागांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांमध्ये तब्बल १२ पैकी १० विद्यार्थिनींनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कला शाखेत वैष्णवी अनिल मासाळ (८६.८३%) हिने प्रथम क्रमांक मिळवला असून संस्कृती रघुनाथ बनकर (८५%) द्वितीय, तर प्रतिभा रेवन्नाथ मासाळ (७६.१७%) हिने तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत त्रिवेणी संतोष कानगुडे (८७.८०%) प्रथम, शुभम नामदेव गवळी (८०%) द्वितीय, तर वैष्णवी भाऊसाहेब वांगडे (७७.१७%) तृतीय आली. विज्ञान शाखेत आरती बाळासाहेब भोसले (८६%) प्रथम, तृप्ती दिलीप गाडे (७६.३३%) द्वितीय आणि शिवम भागवत यादव (७६%) तृतीय ठरले. किमान कौशल्य विभागात दीपाली आप्पासाहेब बागल (७६.८३%) प्रथम, भाग्यश्री दादासाहेब बागल (७५.८३%) द्वितीय, तर दीपाली नवनाथ कांबळे (७१%) तृतीय स्थानावर राहिली. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९६.११%, वाणिज्य शाखेचा ९४.६४%, कला शाखेचा ७५.९३% आणि किमान कौशल्य विभागाचा ८१.५७% इतका लागला आहे. एकूण निकाल समाधानकारक असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे दिसून आले. या यशाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, “मिश्र परीक्षा पद्धती, कॉपीमुक्त वातावरणासाठी सीसीटीव्हीसारख्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी, भरारी व बैठे पथकांची दक्षता यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळाला. मुलींमधील अभ्यासातील सातत्य व गांभीर्य यामुळे त्यांचा टक्का अधिक असल्याचे दिसते.” या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रोहित पवार, अध्यक्ष राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, राजेंद्र काका निंबाळकर, बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे आदी मान्यवरांनी केले.

कर्जत : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालात दादा पाटील महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत मुलींनीच आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य या चारही विभागांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांमध्ये तब्बल १२ पैकी १० विद्यार्थिनींनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
कला शाखेत वैष्णवी अनिल मासाळ (८६.८३%) हिने प्रथम क्रमांक मिळवला असून संस्कृती रघुनाथ बनकर (८५%) द्वितीय, तर प्रतिभा रेवन्नाथ मासाळ (७६.१७%) हिने तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत त्रिवेणी संतोष कानगुडे (८७.८०%) प्रथम, शुभम नामदेव गवळी (८०%) द्वितीय, तर वैष्णवी भाऊसाहेब वांगडे (७७.१७%) तृतीय आली. विज्ञान शाखेत आरती बाळासाहेब भोसले (८६%) प्रथम, तृप्ती दिलीप गाडे (७६.३३%) द्वितीय आणि शिवम भागवत यादव (७६%) तृतीय ठरले. किमान कौशल्य विभागात दीपाली आप्पासाहेब बागल (७६.८३%) प्रथम, भाग्यश्री दादासाहेब बागल (७५.८३%) द्वितीय, तर दीपाली नवनाथ कांबळे (७१%) तृतीय स्थानावर राहिली.
महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९६.११%, वाणिज्य शाखेचा ९४.६४%, कला शाखेचा ७५.९३% आणि किमान कौशल्य विभागाचा ८१.५७% इतका लागला आहे. एकूण निकाल समाधानकारक असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे दिसून आले.
या यशाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, “मिश्र परीक्षा पद्धती, कॉपीमुक्त वातावरणासाठी सीसीटीव्हीसारख्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी, भरारी व बैठे पथकांची दक्षता यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळाला. मुलींमधील अभ्यासातील सातत्य व गांभीर्य यामुळे त्यांचा टक्का अधिक असल्याचे दिसते.”
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रोहित पवार, अध्यक्ष राजेंद्र फाळके, अंबादास पिसाळ, राजेंद्र काका निंबाळकर, बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे आदी मान्यवरांनी केले.

COMMENTS