Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिंबागणेश येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अभिवादन

लिंबागणेश :बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले

कर्जतमध्ये सावित्रीच्या लेकींनी महात्मा फुलेंना केले अभिवादन !
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान प्रतिमेचे उपस्थीतांना वाटप; पार्डी(म) ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
बेलापूर येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रम

लिंबागणेश :
बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश येथे अखंड क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब जाधव होते. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवा सोसायटीचे चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश गायकवाड यांनी केले. या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, साहेबराव निर्मळ, अ‍ॅड. गणेश वाणी, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, जीवन मुळे, सुरेश निर्मळ, मोहनराव कोटुळे, महादेव वाणी, ज्ञानेश्वर कुदळे, संजय पावले, खंडू वाणी, श्रीराम तागड, भीमराव बोराटे, सुभाष मुळे, मल्हारी आबदार, पोपट निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – डॉ. गणेश ढवळे
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली… हा त्यांचा विचार उद्धृत करत त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणले असून, विशेषतः स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजाला नवी दिशा दिली, असे त्यांनी नमूद केले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षण सर्वांसाठी खुले केले. अज्ञानाचा अंधार दूर करून समाज सक्षम बनवण्याचा त्यांचा विचार आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे डॉ. ढवळे यांनी सांगितले. सत्यशोधक विचारातून समाजाला जागृत करत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. माणुसकी हाच खरा धर्म असा संदेश देत त्यांनी अनिष्ट रूढी-परंपरांना विरोध केला. शेतकरी हा देशाचा कणा असून तो अन्याय, कर्जबाजारीपणा व सामाजिक उपेक्षेखाली दबला जात असल्याचे वास्तवही त्यांनी मांडले. सामाजिक समतेसाठी आयुष्यभर झटणारे महात्मा फुले यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

COMMENTS