Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केजमध्ये ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यातवारसाचा फेर घेण्यासाठी मागितली 39 हजारांची लाच

केज :केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथे ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून, वारसाचा फेर करण्यासाठी तब्बल 39 हजा

मुखेडच्या मुख्याध्यापकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेबदली करून देणे, नोटीस न देणे आणि ‘हप्ता’ प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
स्वाक्षरीसाठी तीन हजारांची लाच; करखेलीतील वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या सापळ्यात
नांदेडमध्ये ’संत’, बदलीनंतर ’सापळ्यात’; प्रामाणिकपणाचा मुखवटा अखेर गळाला!


केज :
केज तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथे ग्राम महसूल अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून, वारसाचा फेर करण्यासाठी तब्बल 39 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिफळ वडमाउली सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर जाधव यांनी पिराचीवाडी (ता. केज) येथील एका शेतकर्‍याकडून वारसाचा फेर घेण्यासाठी 39 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 35 हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली होती. मात्र संबंधित शेतकर्‍याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार सापळा रचण्यात आला. दि. 8 एप्रिल रोजी दुपारी दहिफळ वडमाउली येथे 9 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर जाधव यांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक सोपान चित्तमपल्ले, पोलीस निरीक्षक बीडकर, सुरवसे, पुरी आदी अधिकार्‍यांचा सहभाग होता. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS