बीड येथील आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात भारतीय आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्

बीड येथील आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात भारतीय आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. ए. हावळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी मुख्याध्यापक बी. ए. हावळे यांनी मार्गदर्शन करताना राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य केले. सामाजिक न्याय आणि समानतेच्या विचारांचा त्यांनी केलेला पुरस्कार आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष मेश्राम यांनी केले. सूत्रसंचालन पवळ यू. बी. यांनी केले, तर आभार प्रदर्शन डब्ल्यू. एस. वाघमारे यांनी मानले. याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक विजय देशमुख, गवते एन. के., आनंद छात्रालयाचे अधीक्षक डी. व्ही. खरसाडे, शिक्षकेतर कर्मचारी एस. एस. गायकवाड, भारत कोळेकर तसेच विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS