Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत तालुक्यात डोक्यात दगड घालून खून

कर्जत ः सख्ख्या चुलत भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे रविवारी रात्री घडली. या घटनेन

 नगरसेवकाच्या घरासमोर धारदार शस्त्राने दोघांची निर्घृण हत्या
पोटच्या पोरीनच आईला संपवलं.
श्रीगोंद्यातील कोथूळ शिवारात तरुणाची हत्या

कर्जत ः सख्ख्या चुलत भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे रविवारी रात्री घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. राक्षसवाडी बुद्रुक येथील विकास दिलीप चिंधे, रा. राक्षसवाडी बुद्रुक, वय तीस असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पप्पू शांतीलाल चिंधे, रा. बेलवंडी असे खून करणार्‍या युवकाचे नाव आहे. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच सोमवारी उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक मारुती मुळूक व कर्जत पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पप्पू चिंधे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

COMMENTS