Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेच्या 122 अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द

https://www.youtube.com/watch?v=5K9RhxYI_4s मुंबई: मुंबई महापालिकेने 122 अभियंत्यांच्या बदल्या (122 engineers transfers) अखेर रद्द केल्या आह

माळाकोळी येथे जलजीवन मिशनच्या पाइपसाठ्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
वनविभागाचा गलथान कारभार; पैसा आडवा, माती जिरवा
पो.नि. मारोती मुंडे पोलीस वर्दीवर असताना काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकरांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्यामुळे देगलूरात खळबळ;पोलीस निरीक्षक राजकीय कार्यकर्ते की अधिकारी यावर संदिग्धता

मुंबई: मुंबई महापालिकेने 122 अभियंत्यांच्या बदल्या (122 engineers transfers) अखेर रद्द केल्या आहेत. बदल्यांमध्ये कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’च्या आरोपांमुळे हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर तक्रारी, आक्षेप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे संपूर्ण प्रक्रिया वादात सापडली होती. महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईची मागणी केल्यानंतर प्रशासन हललं. अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे हे प्रकरण पाठवण्यात आलं आणि अखेर 122 अभियंत्यांच्या बदली आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
RTI कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांनी या बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी यांनी या बदल्यांना स्थगिती दिली होती. आता त्या बदल्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. एकीकडे हा निर्णय भ्रष्टाचारा विरोधातील कारवाई म्हणून पाहिला जात असला, तरी दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्या रद्द कराव्या लागणं, ही प्रशासनातील अनियमिततेची कबुली मानली जात आहे.

COMMENTS