Homeताज्या बातम्या

मिनी बस दरीत कोसळून दोन पर्यटकांचा मृत्यू; राजगड परिसरातील पाबे घाटातील भीषण अपघात

पुणे: जिल्ह्यातील राजगड परिसरात पर्यटन आणि गिरिभ्रमणासाठी (ट्रेकिंग) निघालेल्या पर्यटकांच्या सहलीवर दुःखाचे सावट पसरले आहे. मुंबईतील अंधेरी परिसर

हजूर साहिब गुरुद्वारा कायद्यातील बदलास मनबीरसिंघ ग्रंथी यांचा विरोध; राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध शीख समाज आक्रमक
अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
आरक्षण वाचवण्यासाठी २६ जूनला चैत्यभूमीवर उपस्थित राहा; उपवर्गीकरणाला विरोध करण्याचे अ‍ॅड. तेजस वडमारे यांचे आवाहन
राजगडावर जाताना पाबे घाटात बस दरीत कोसळली, दोघांचा मृत्यू | Saamana (सामना)

पुणे: जिल्ह्यातील राजगड परिसरात पर्यटन आणि गिरिभ्रमणासाठी (ट्रेकिंग) निघालेल्या पर्यटकांच्या सहलीवर दुःखाचे सावट पसरले आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातून आलेल्या पर्यटकांची मिनी बस पाबे घाटात दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे वीस पर्यटकांचा गट राजगड किल्ल्यावर गिरिभ्रमणासाठी निघाला होता. पहाटेच्या सुमारास त्यांची मिनी बस पाबे घाटातून प्रवास करत असताना एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे २० ते २५ फूट खोल दरीत कोसळली. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकही तिथे पोहोचले. दरीत अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ, पोलीस आणि बचाव पथकाने संयुक्तपणे प्रयत्न केले.

या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चालकासह काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय पथक त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून आहे. दरम्यान, दरीत कोसळलेली मिनी बस बाहेर काढण्यासाठी जड यंत्रसामग्रीची (क्र्रेन) मदत घेण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर वाहन बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची नोंद केली असून वाहनावरील नियंत्रण का सुटले, याचा तपास सुरू केला आहे. चालकाला आलेली झोप, घाटातील अवघड वळण किंवा तांत्रिक बिघाड यांसह विविध शक्यतांचा तपास केला जात आहे. आनंद आणि उत्साहाने सहलीसाठी निघालेल्या पर्यटकांवर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

COMMENTS