Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात

श्रीगोंदा : महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. साळवे यांनी आपल्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा गौरव केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची तसेच वीरांची भूमी आहे. थोर समाजसुधारकांच्या त्यागातून महाराष्ट्र समृद्ध झाला असून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महान त्यागी पुरुषांचेही त्यांनी स्मरण केले. तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, आयक्यूएसी समन्वयक डॉ. राहुल गायकवाड, एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. किरण ढवळे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. राजाराम कानडे, अधीक्षक बाळासाहेब राऊत यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप दरेकर यांनी केले.

ब्राह्मणवाडा येथील ब्रिटिशकालीन विश्रामागृह वणव्यात खाक
राहाता शहरात समता परिषदेचा जनजागृती रथ दाखल
बसवेश्वरांच्या विचारांनी समाजात समता रुजवली : आ.मोनिका राजळे

श्रीगोंदा : महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. साळवे यांनी आपल्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा गौरव केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची तसेच वीरांची भूमी आहे. थोर समाजसुधारकांच्या त्यागातून महाराष्ट्र समृद्ध झाला असून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महान त्यागी पुरुषांचेही त्यांनी स्मरण केले. तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, आयक्यूएसी समन्वयक डॉ. राहुल गायकवाड, एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. किरण ढवळे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. राजाराम कानडे, अधीक्षक बाळासाहेब राऊत यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप दरेकर यांनी केले.

COMMENTS