Homeताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या कष्टाला आदराची गरज, लोकप्रतिनिधींनी शिवरायांच्या नीतिमत्तेचा अंगीकार करावा : खासदार छत्रपती शाहू महाराज

अकोले : "छत्रपती शिवरायांचे राज्य हे खऱ्या अर्थाने 'न्याया'चे होते. आजच्या व्यवस्थेतही त्याच न्यायाची, पारदर्शकतेची आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला आदर

संपादक कर्णा जाधव ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारा’ने सन्मानित; राहुरीत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
शिर्डी साईबाबा संस्थानचे वार्षिक उत्पन्न ६३८ कोटी; सोन्या-चांदीच्या देणगीत यंदा लक्षणीय वाढ
बापूसाहेब देशमुख लिखित छत्रपती शिवरायांवरील दोन पुस्तकांचे आज पुण्यात भव्य प्रकाशन; उपमुख्यमंत्री आणि शाहू छत्रपतींची उपस्थिती

अकोले : “छत्रपती शिवरायांचे राज्य हे खऱ्या अर्थाने ‘न्याया’चे होते. आजच्या व्यवस्थेतही त्याच न्यायाची, पारदर्शकतेची आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला आदराची नितांत गरज आहे. आजच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यासाठी लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतिमत्तेचा अंगीकार करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले.

कोतूळ (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथील बापूसाहेब देशमुख लिखित ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ या मराठी, तर ‘द पायोनिअर ऑफ मराठा एम्पायर : छत्रपती शिवाजी महाराज’ या इंग्रजी पुस्तकाच्या भव्य प्रकाशन सोहळ्यात ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. पुण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहू न शकल्याने त्यांनी पाठवलेला विशेष संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे म्हणाले की, शिवरायांनी अवघ्या १२ व्या वर्षी वडिलांच्या विखुरलेल्या जहागिरीला सावरून, सर्व जाती-धर्माच्या रयतेला एकत्र करत स्वराज्य उभारले. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून उभारलेले हे राज्य आजही जगासाठी आदर्श आहे. या सोहळ्याला इतिहास लेखक डॉ. श्रीमंत कोकाटे, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष प्रा. एस. झेड. देशमुख, उद्योजक रोहिदास दांगट, बाबाराजे जाधवराव, अजित देशमुख व सुरेशराव कोते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिदास दांगट यांनी केले, तर सूत्रसंचालन मुकुंद काकडे यांनी केले.

COMMENTS