Homeताज्या बातम्या

महिला बचत गटातील सदस्यांसाठी पीएमएफएमई योजनेंतर्गत प्रशिक्षण व प्रमाणपत्र वाटप-सभापती आरती बनसोडे

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (झचऋचए) योजनेअंतर्गत बीज भांडवल कर्जाचा लाभ घेतलेल्या महिला बचत गटातील सभासदांसाठी तीन दिवसीय अनिवासी प

राष्ट्रवादीमुळेच आमची घडी बसली-मोईन मास्टरअजितदादांनी सामान्य भीमकन्येला खुर्चीत बसवून सामाजिक न्यायाचा विचार जपला – प्रेमलताताई पारवे
सुभाष रोड बनणार संत मुक्ताई मार्ग !संत-महंतांच्या उपस्थितीत शनिवारी नामफलकाचे अनावरणबीड नगर परिषदेचा ऐतिहासिक निर्णय
35 वर्षांत जे झाले नाही, ते आता बीडकरांना पाहायला मिळत आहे!



प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (झचऋचए) योजनेअंतर्गत बीज भांडवल कर्जाचा लाभ घेतलेल्या महिला बचत गटातील सभासदांसाठी तीन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रेमलता ताई पारवे व नगरसेविका आरती रंजित बनसोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले व नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी कौतुक करत रोजगार निर्मितीसाठी सदरील समितीस प्रयत्नशील राहील तसेच राज्यस्तरीय तांत्रिक संस्था तथा कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या पत्रानुसार, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महिला बचत गटातील सदस्यांना अन्नप्रक्रिया व्यवसाय उभारणीसाठी बीज भांडवल कर्ज उपलब्ध करून दिले जाईल . या लाभार्थी महिलांना उद्योग व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया, विपणन, गुणवत्ता नियंत्रण आणि व्यवसाय कौशल्याबाबत प्रशिक्षण देण्याची तरतूद आहे. याच अनुषंगाने बीड नगरपरिषद सभागृहात दि. 15 जुलै 2026 ते 17 जुलै या कालावधीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच प्रशिक्षणासाठी संबंधित बचत गटांतील सर्व सभासद उपस्थित होते याची दक्षता घेऊन प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुपालन अहवाल सादर करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. नगरसेविका आरती रंजित बनसोडे यांनी सांगितले की, या प्रशिक्षणामुळे महिला बचत गटातील सदस्यांना अन्नप्रक्रिया उद्योगाविषयी आवश्यक तांत्रिक ज्ञान, व्यवसाय कौशल्य आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ घेता येईल. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास आणि स्वयंरोजगाराला चालना मिळण्यास मदत होणार आहे. असे सभापती आरती रंजीत बनसोडे यांनी म्हटले आहे.. हा कार्यक्रम आमदार विजयसिंह पंडित तसेच उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला…

COMMENTS