Homeताज्या बातम्या

बेलवंडी स्टेशन शाळेतील विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी उत्साहात

श्रीगोंदा  : वाढते तापमान, कमी होत चाललेले वृक्ष आणि बिघडत असलेले पर्यावरणीय संतुलन याबाबत समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलवंडी स्टेशन येथील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी उत्साहपूर्ण वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत गावातून दिंडी काढत “झाडे लावा, झाडे जगवा”, “वृक्ष आहेत जीवनाचा श्वास”, “पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.दिंडीदरम्यान स्टेशनजवळील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विद्यार्थ्यांनी भजन, फुगड्या आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून आनंद व्यक्त केला. यावेळी नवनाथ काळे यांनी उपस्थितांना खिचडी व केळीचे वाटप केले. तसेच नवनाथ काळाणे व त्यांच्या कुटुंबीयांनी दिंडीचे विधीवत पूजन केले. यानंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाला अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष   बाळासाहेब काकडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रामदास ठाकर, माजी उपसरपंच बाजीराव काळाणे, केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे, प्रशांत लबडे, बाबा कापसे, सुनील कारंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, माता-पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बापूराव खामकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुनीता काळाणे, शोभा काळाणे, स्वाती काळाणे, अश्विनी हिरडे, दिपाली वाजे, सुनिता लबडे, प्रियंका काळाणे, सोनाली काळाणे, लता मुठाळ, मंदाकिनी जाधव, पूजा काळे, अश्विनी पवार, सहशिक्षिका मंदोदरी भोसले, वैशाली देशमुख, वैभव हिरडे तसेच सर्व माता-पालकांनी विशेष परिश्रम घेतले.

आठ गाई गेल्या… पण माणुसकी जिवंत राहिली ! 
चहाच्या पॅकेटवर उत्पादन दिनांकच नाहीश्रीगोंद्यात  ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
‘ ड्रंक  अँड ड्राईव्ह’विरोधात कारवाई; पाच वाहनचालकांवर गुन्हे

COMMENTS