Homeताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे आज धरणे आंदोलन!सुरक्षित भवितव्यासाठी विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे – सतीश शिंदे

देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी संबंधित प्रश्न, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि करिअरसाठी मेहनत घेणार्‍या प्रत्येक युवकाला न्य

पोलिसांच्या कर्तव्यशून्यतेमुळे कोपरगावात अराजकता
पंतप्रधान मोदी 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्ड करणार वितरित
छत्रपती संभाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा निवारा केंद्रात अन्नदान तसेच  जेष्ठ नागरिक व पत्रकारांचा सन्मान



देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी संबंधित प्रश्न, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि करिअरसाठी मेहनत घेणार्‍या प्रत्येक युवकाला न्याय मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज, दि. 20 जुलै रोजी, बीड येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात विद्यार्थी, पालक, युवक आणि सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे यांनी केले आहे.
शिक्षण व्यवस्था ही देशाच्या भवितव्याचा पाया आहे. मात्र, परीक्षा प्रक्रियेत सातत्याने घडणारे गैरप्रकार, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा खेळ आणि जबाबदार यंत्रणांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाला न्याय, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, त्यासाठी लोकशाही मार्गाने आवाज उठविणे ही काळाची गरज आहे. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थी आणि युवकांनी आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवत शांततापूर्ण आंदोलनात सहभागी व्हावे. आजचा संघर्ष हा केवळ एका परीक्षेचा नसून, देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षित भवितव्याचा आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि युवकांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सतीश शिंदे यांनी केले या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, पालक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
————–

COMMENTS