Homeताज्या बातम्याअहमदनगर

जामखेमधील मदारी वस्ती तहानलेलीपाण्याठी महिलांची रोजची वणवण ; प्रशासनाचे दुर्लक्ष

 जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील मदारी वस्ती आणि परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या झळांमुळे परिसरातील तळे व पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत.  तेथे दुर्गंधी पसरू लागली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या वस्तीकडे ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाण्याच्या या लोकांना वणवण फिरावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मदारी वस्तीसाठी दररोज पाण्याचा टँकर सुरू करावा अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ऍड. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मदारी वस्तीतील महिला व नागरिक संबंधित प्रशासनाला देणार आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः महिलांना डोक्यावर हांडे भांडे घेऊन पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असून, अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे.“पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. ग्रामपंचायतीमार्फत कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाइपलाईन करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा भीषण संकटाला सामोरे जावे लागू नये, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास मदारी वस्तीतील पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. स्वतंत्र पाइपलाईनची आवश्यकतापाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. ग्रामपंचायतीमार्फत कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाइपलाईन करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा भीषण संकटाला सामोरे जावे लागू नये, अशीही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लक्ष्मीबाई राजळे यांचे निधन
वसंत रांधवण यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
बाबुजी आव्हाड महाविद्यालयाकडून बिजारोपण

COMMENTS