बीड : देशात व राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणार्या अन्याय, अत्याचार, मॉब लिंचिंग, हेट स्पीच तसेच समाजाविषयी बेताल वक्तव्य करणार्या काही

बीड : देशात व राज्यात अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणार्या अन्याय, अत्याचार, मॉब लिंचिंग, हेट स्पीच तसेच समाजाविषयी बेताल वक्तव्य करणार्या काही नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी अस्तित्वात असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी 1 मे रोजी महाराष्ट्र स्वतंत्र दिनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
हे आंदोलन सकाळी 10.30 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाला अत्तार वेलफेअर ट्रस्टने जाहीर पाठिंबा दिला असून ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी अकबर अत्तार यांनी यासंदर्भात माहिती दिली. आंदोलनाचे नेतृत्व इलियास इनामदार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि न्याय मिळवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे पाऊल असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

COMMENTS