Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोहनेर सरपंच प्रकरणात अपात्रतेचे अपील नामंजूर; अ‍ॅड. सय्यद शाकेर यांच्या भक्कम युक्तिवाद

परळी : तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोहनेर ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरोधात दाखल करण्यात आलेले अपात्रतेचे अपील अखेर नामंजूर करण्

15 ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; ब्लॅकस्पॉट कमी करण्याचे निर्देश;खा. बजरंग सोनवणे यांचा अधिकार्‍यांना इशारा
गेवराईत आदर्श पायंडा: महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समन्वयातून सन्मानपूर्वक स्थलांतरित
पाटोदा नगर पंचायत सदस्य अपात्रता प्रकरणात निकालासाठी जिल्हाधिकार्‍यांना 4 आठवड्यांची मुदत; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

परळी : तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोहनेर ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरोधात दाखल करण्यात आलेले अपात्रतेचे अपील अखेर नामंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी साहेब बीड  यांनी सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर अर्जदारांचे आरोप अपुरे व असिद्ध ठरवत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
सदर प्रकरणात सरपंच कुरेशी   रुखयाबी यांनी सरपंच पदाकरीता नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी त्यांनी अपत्याबाबत चे स्वयंघोषणापत्र चुकीचे बनावट दाखल केलेले होते असा आरोप करत त्यांनी अपत्या बाबत ची माहिती लपवून निवडणूक प्रक्रियेदरम्यान चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान सादर झालेल्या कागदपत्रांची तपासणी, शासकीय नोंदी आणि संबंधित पुराव्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर आरोपांना ठोस आधार नसल्याचे स्पष्ट झाले. सरपंच कुरेशी रुखयाबी यांच्या वतीने ड. सय्यद शाकेर इसाक यांनी प्रभावी आणि कायदेशीर दृष्ट्या भक्कम युक्तिवाद सादर केला. त्यांनी अर्जदारांकडून मांडण्यात आलेल्या प्रत्येक मुद्द्याला कायदेशीर उत्तर देत, नामनिर्देशन प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नियमांनुसार झाल्याचे दाखवून दिले. तसेच, कोणतीही माहिती लपविणे किंवा चुकीची माहिती देणे सिद्ध होत नसल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.  जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात नमूद केले की, अर्जदाराने गैरअर्जदार  यांच्या अपत्याबाबत केलेला आरोप हा ठोस, निर्विवाद व कायदेशीर दृष्ट्या  ग्राह्य पुराव्याने सिद्ध केलेले नाही .अर्जदाराने सादर केलेले कागदपत्रे हे अपूर्ण व विवादित असून त्यावरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1969 च्या कलम 14 (ज-1) अंतर्गत सरपंच कुरेशी रुखयाबी यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरविण्यास पुरेसा व विश्वासहार्य आधार उपलब्ध नाही.  अपात्रतेसाठी आवश्यक असलेले ठोस पुरावे सादर करण्यात अर्जदार अपयशी ठरले आहेत. परिणामी, अपात्रतेचा दावा ग्राह्य धरता येत नसल्याने अपील नामंजूर करण्यात येत आहे. या निकालामुळे  सरपंच कुरेशी रुखयाबी यांना मोठा दिलासा मिळाला असून, ड. सय्यद शाकेर यांच्या युक्तिवादाची कायदेवर्तुळात प्रशंसा होत आहे. सदर प्रकरणात अ‍ॅड. सय्यद शाकेर यांना अ‍ॅड. सय्यद साजेद अली यांनी मार्गदर्शन केले.

COMMENTS