Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

के.एस.पी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

बीड : शहरातील कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय (के.एस.पी विद्यालय) येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्

मुस्लिम संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाक्षणिक आंदोलन; अत्तार वेलफेअर ट्रस्टचा पाठिंबा
सदावर्ते प्रकरणी मनसे आक्रमक
जनगणना 2027 चा पहिला टप्पा; महाराष्ट्र दिनी 1 मे पासून सुरुवात; राज्यात घरसूची व घरगणना मोहीम

बीड : शहरातील कर्मयोगिनी सावित्रीबाई फुले विद्यालय (के.एस.पी विद्यालय) येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, धार्मिक गीतांवर नृत्य, नाटिका तसेच प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. यावेळी मागील शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अंकुश राऊत उपस्थित होते. तसेच संस्था मार्गदर्शक सौ. अंजलीताई शेळके, प्रमुख पाहुणे ऋषिकेशजी शेळके (ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा समग्र शिक्षा विभाग प्रमुख), शाळेचे प्र. मुख्याध्यापक विशाल सुपेकर, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

COMMENTS