Homeताज्या बातम्या

मदतीचा फार्स! प्रशासनाने संकटग्रस्त शेतकऱ्याला दिलेला बैल निघाला गंभीर आजारी

लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांची व्यथा पाहून प्रशासनाने १० जून रोजी तातडीने त्यांना एक बैल द

NEET पेपरफुटीतून कोट्यवधींची कमाई; मनीषा मांधरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीत होती सहभागी; लातूरचा प्राध्यापकही रडारवर
बीड जिल्ह्यातील शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार! वाढत्या तापमानामुळे जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय
उखलगाव येथील शाळेस तातडीने शिक्षक द्या; श्रीगोंद्यात पालक व ग्रामस्थांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
मदत की शेतकऱ्याची क्रूर थट्टा, मदत म्हणून दिलेला बैल निघाला आजारी, नांगराला  लावताच खाली कोसळला | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांची व्यथा पाहून प्रशासनाने १० जून रोजी तातडीने त्यांना एक बैल दिला. मात्र, हा बैल आधीपासूनच गंभीर आजारी असल्याचे आता समोर आले आहे.

शासकीय मदतीचा मोठा गाजावाजा करत पशुसंवर्धन विभागाने दिलेला हा बैल अवघ्या दोनच दिवसांत शेतात काम करताना खाली बसला आणि त्याने मान टाकली. यानंतर तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता, हा बैल गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळण्याऐवजी आता त्या आजारी बैलाच्या उपचाराचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

COMMENTS