Homeताज्या बातम्या

पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमाभागात तीन पाकिस्तानी ड्रोन पाडले, शस्त्रसाठा जप्त

अमृतसर: पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत आलेले तीन ड्रोन पाडले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी वंचितांच्या व्यथा मांडल्या : आमदार आशुतोष काळे
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; उभ्या कंटेनरला टॅक्सी जीपची जोरदार धडक, ८ जण जखमी
’तक्रारींचा महापूर, उत्तरांची प्रतीक्षा’; पाणी, गटारे आणि अस्वच्छतेवरून प्रशासनाला लोकप्रतिनिधींचा जाब
पाकिस्तानी की नापाक साजिशों का मुंहतोड़ जवाब ; पंजाब में इस वर्ष BSF ने मार  गिराए 100 पाकिस्तानी ड्रोन - Jammu Kashmir Now | The facts and information  about J&K

अमृतसर: पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत आलेले तीन ड्रोन पाडले. त्यानंतर हाती घेण्यात आलेल्या व्यापक शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तस्कराला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खांबरा विभागातील सीमा सुरक्षा दलाच्या १४२ व्या तुकडीचे जवान रात्री गस्त घालत असताना मंगली सीमेवरील चौकी परिसरात आकाशात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. निरीक्षणादरम्यान पाकिस्तानच्या दिशेने सलग तीन ड्रोन भारतीय हद्दीकडे येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जवानांनी तातडीने गोळीबार करून ड्रोन पाडण्याची कारवाई केली. घटनेनंतर संपूर्ण परिसरात कसून शोध मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी मनजित सिंग या संशयित तस्कराला ताब्यात घेतले. तो तरनतारन जिल्ह्यातील वान गावचा रहिवासी असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तरनतारनचे पोलिस अधीक्षक सुरिंदर लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेत सात परदेशी बनावटीची पिस्तूलं, एक सुरक्षा वापरांतील बंदूक, ८९ जिवंत काडतुसे तसेच एक भ्रमणध्वनी (मोबाईल) जप्त करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा पाकिस्तानतील तस्करांच्या माध्यमातून भारतात पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी खांबरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तस्करीच्या संपूर्ण जाळ्याचा शोध घेण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ड्रोनच्या माध्यमातून भारतात आणण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात सीमा सुरक्षा दलाला यश मिळाल्याने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

COMMENTS