Homeताज्या बातम्या

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी वंचितांच्या व्यथा मांडल्या : आमदार आशुतोष काळे

कोपरगाव :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी

तहसील कार्यालय-निरा हॉस्पिटल मार्गावरील नालीचा नैसर्गिक उतार अडवल्याने नागरिकांचा संताप; नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन
नीट पेपरफुटीप्रकरणी राजधानीत आमरण उपोषण; सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सुरुवात

कोपरगाव :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली. त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या व्यथा प्रभावीपणे मांडून समानता, न्याय आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

समाजातील शोषित, वंचित आणि सर्वसामान्यांच्या जीवन संघर्षाला आपल्या लेखणी व शाहिरीतून आवाज देणारे थोर साहित्यिक, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला एकतेचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाचा मार्ग दाखवतात. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक समता, न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्यरत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोपरगाव शहरात विविध ठिकाणी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमांना आमदार आशुतोष काळे यांनी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नितीन साबळे, अर्जुन मरसाळे, राजेंद्र खैरनार, दिलीप तुपसुंदर, संतोष मरसाळे, सुनील वैरागळ, राजेंद्र वैरागळ, संजय साळवे, भागवत साहेब, रवी धिवर, भारत सदर, राजेंद्र कांबळे, दिनेश गाडेकर, ओम आढाव, हर्षल जैस्वाल, हारुण शेख, अजय शेळके आदी उपस्थित होते.

COMMENTS