Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत किसनगिरी नगर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शुभारंभ

अहमदनगर- प्रातःस्मरणीय सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने व व भास्करगिरी बाबा यांच्या प्रेरणेने   गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या परिसरात श्

संगमनेरमध्ये वीजेच्या कडकडाटासह गारांचा अवकाळी पाऊस
पत्नीच्या खून प्रकरणी पतीला जन्मठेप
आ. थोरात यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट

अहमदनगर- प्रातःस्मरणीय सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने व व भास्करगिरी बाबा यांच्या प्रेरणेने   गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या परिसरात श्रीमद् भागवत कथेचे दिव्यचिंतन करीत आहोत.हजारो जन्माच्या मिळविलेल्या पुण्याने श्रीमद् भागवत कथा ऐकण्याची बुद्धी प्राप्त होते.ऋषीमुनींनी जे समृद्ध भंडार ठेवले आहे.ते आपण कथेच्या माध्यमातून श्रवण करावे. जीवनात व प्राप्त झाले तर कायमच टिकतील असे नाही.परमात्मा भगवंत प्राप्त झाले तर ते कायमचे प्राप्त होतात. श्रीमद् भागवत निष्ठेने जे श्रवण करतात त्यांचे सकल दुःखांचा नाश होतो.आणि परमानंदाची प्राप्ती होते.भवरोगाचे रामबाण औषध भागवत आहे. सत्संग म्हणजे काय आहे? ज्या संगाने भोगाचे महत्त्व कमी होते.ज्या संगाने परमात्मा भगवंत प्राप्त होतो. त्याला सत्संग म्हणतात, नामस्मरण करण्याची प्रेरणा निर्माण होते त्याला सत्संग म्हणतात.श्रीमद् भागवत हे मनोरंजनाचे साधन नाही तर मनोभंजनाचे साधन आहे. मनोज कृष्णमय कसे करायचे आहे हे शिकवणारे भागवत आहे. भोगाच्या दिशेने चाललेली दिशा भगवंताच्या दिशेकडे वळविण्यासाठी श्रीमद् भागवत हे शास्त्र आहे.असे निरूपण भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी प.पू.अनुराधा दीदी यांनी पहिले पुष्प गुंफताना केले आहे.पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी संत किसनगिरी नगर परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.श्रीमद् भागवत ग्रंथाचे पालखीत पूजन करून तसेच वारकरी भजनी मंडळ व महिला मंडळ तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.महिलांनी फुगडीचा फेर धरला,परिसरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी परमपूज्य अनुराधा दीदी यांची बगीतून मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.    

COMMENTS