Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायतींचा धुराळा जोरात, दोन हजार जागांसाठी चौपट उमेदवार

येत्या बुधवारी होणार चित्र स्पष्ट

अहमदनगर प्रतिनिधी - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राजकारणाचा धुराळा उडाला आहे. ग्रामपंचायतींच्या सुमारे दोन हजार जागांसाठी चौपट म्हणजे तब्बल 8 हजार

डॉ. शिवाजी काळेे यांचा सन्मान म्हणजे एका ज्ञानतपस्वी शिक्षकाचा गौरव  
Ahmednagar : शहरात भाजप आक्रमक… राज्य सरकारचा निषेध… जशास तसे उत्तर देण्याचा इशारा l Lok News24
काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी अहोरात्र काम करणार

अहमदनगर प्रतिनिधी – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राजकारणाचा धुराळा उडाला आहे. ग्रामपंचायतींच्या सुमारे दोन हजार जागांसाठी चौपट म्हणजे तब्बल 8 हजारावर उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आधी सुरू असलेल्या ऑनलाईन उमेदवारीला तांत्रिक अडचणी येत असल्याने अखेरच्या दिवशी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यासह अर्ज करण्यास सुमारे दोन तास मुदतवाढही दिली गेल्याने त्याचा फायदा घेत अनेक हौशे-नवशे व गवशे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, या निवडणुकांसाठी येत्या बुधवारी (7 डिसेंबर) उमेदवारी माघारीचा अख़ेरचा दिवस असल्याने या दिवशी किती रणछोडदास माघार घेतात, यावर निवडणूक रिंगणाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.


जिल्ह्यात सध्या 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी सर्व मिळून 8 हजार 376 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीत जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंचपद व सदस्यत्व यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. जनतेतून निवडल्या जाणार्‍या सरपंचांच्या 203 जागांसाठी 1 हजार 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर ग्रामपंचायत सदस्यांच्या 1 हजार 922 जागांसाठी तब्बल 7 हजार 94 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
येत्या 18 डिसेंबरला नगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपासून उमदेवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सुरुवातीचे तीन दिवस उमेदवारीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, ऑनलाईन अर्ज दाखल करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने आणि त्याबाबत तक्रारी झाल्यानंतर गुरुवारपासून ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाल्यावर गुरुवारी एकाच दिवशी सुमारे दीड हजारांवर उमदेवारी अर्ज दाखल झाले. तर शुक्रवारी म्हणजे उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी साडेपाचपर्यंत मुदत देण्यात आली होती. यामुळे सर्वच तालुक्यात इच्छुकांनी गर्दी करीत उमदेवारी अर्ज दाखल केले.
आता 203 ग्रामपंचायतींसाठी 8 हजार 376 उमदेवारी अर्ज दाखल झाले असून सोमवार (दि.5 डिसेंबर) रोजी दाखल अर्जांची छाननी होणार असून बुधवार (दि.7) तारेखला माघारीचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

तालुकानिहाय अर्ज असे – अकोले ः 11 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्यांसाठी 192 तर सरपंच पदासाठी 48 अर्ज.
-संगमनेर ः 37 ग्रामपंचायतींच्या 367 सदस्यांसाठी 1 हजार 25 तर सरपंच पदासाठी 251 अर्ज.
-कोपरगाव ः 26 ग्रामपंचायतींच्या 248 सदस्यांसाठी 878 तर सरपंच पदासाठी 159 अर्ज.
-श्रीरामपूर ः 6 ग्रामपंचायतींच्या 54 सदस्यांसाठी 162 तर सरपंच पदासाठी 39 अर्ज.
-राहाता ः 12 ग्रामपंचायतींच्या 132 सदस्यांसाठी 425 तर सरपंच पदासाठी 71 अर्ज.
-राहुरी ः 11 ग्रामपंचायतींच्या 115 सदस्यांसाठी 493 तर सरपंच पदासाठी 88 अर्ज.
-शेवगाव ः 12 ग्रामपंचायतींच्या 116 सदस्यांसाठी 410 तर सरपंच पदासाठी 70 अर्ज.
-कर्जत ः 8 ग्रामपंचायतींच्या 25 सदस्यांसाठी 300 तर सरपंच पदासाठी 50 अर्ज.
-जामखेड ः 3 ग्रामपंचायतींच्या 27 सदस्यांसाठी 132 तर सरपंच पदासाठी 26 अर्ज.
-श्रीगोंदा ः 10 ग्रामपंचायतींच्या 110 सदस्यांसाठी 459 तर सरपंच पदासाठी 94 अर्ज.
-नेवासा ः 13 ग्रामपंचायतींच्या 125 सदस्यांसाठी 72 तर सरपंच पदासाठी 47 अर्ज.
-नगर ः 27 ग्रामपंचायतींच्या 243 सदस्यांसाठी 751 तर सरपंच पदासाठी 150 अर्ज.
-पारनेर ः 16 ग्रामपंचायतींच्या 160 सदस्यांसाठी 638 तर सरपंच पदासाठी 103 अर्ज.
-पाथर्डी ः 11 ग्रामपंचायतींच्या 109 सदस्यांसाठी 414 तर सरपंच पदासाठी 64 अर्ज.

COMMENTS